Loading Events
WhatsApp Image 2026-06-29 at 12.10.53 PM

कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ "सुरमयी सायंकाळ"

कलासक्त आयोजित 'सुरमयी सायंकाळ' मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कलासक्तचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले व कलाकारांचा सत्कार केला. तर संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. विनिता आपटे यांनी सर्व कलाकारांचा आणि त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा परिचय करून दिला.

हा कार्यक्रम रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता शाकुंतल हॉल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे संपन्न झाला.

या ‘सुरमयी सायंकाळ’ मैफिलीची सुरुवात दोन्ही युवा कलाकारांनी सुंदर रागदारीने व भक्तीपूर्ण रचना सादर करून केली. भक्ती पवार आणि हर्षद डोंगरे यांनी आपल्या बहारदार गायकीने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले. मैफिलीत विविध राग आणि त्यांमधील बंदिशींच्या सादरीकरणानंतर सुंदर उपशास्त्रीय रचना व नाट्यगीतांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. दोन्ही कलाकारांच्या जुगलबंदीला आणि सुरावटींना उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.

या मैफिलीत गणेश तानवडे (तबला), अक्षय कुलकर्णी (तबला) आणि मालु गावकर (संवादिनी/हार्मोनियम) यांनी उत्कृष्ट साथसंगत करून कार्यक्रमाची उंची अधिक वाढवली.

Some Moment Of Events