‘ कलासक्त ‘ पुणे प्रस्तुत शास्त्रीय संगीत मैफिलीत विदुषी मंजिरी कर्वे – आलेगांवकर यांच्या गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्रीय गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे. हा ‘कलासक्त ‘ चा उद्देश आहे.
कलासक्त चे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून कलाकारांचा सत्कार केला. विनीता आपटे यांनी कलाकारांचा परिचय करून दिला.
हा कार्यक्रम ८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार संघ येथील सभागृहामध्ये झाला.
कार्यक्रमाची सुरुवात राग ‘ श्री ‘ मधील रचना सादर करून झाली. ‘गरीब नवाझ तुम हो मेरे साई ‘, ‘अर्धांगिनी गिरीजा गौरी ‘ या रचना त्यांनी सादर केल्या. त्यानंतर त्यांनी तराणा सादर केला. नंद रागातील ‘ ढुंढू बारे तोहे सय्या सकल बन बन ‘ राज न अब तो आ जा रे ‘ या बंदिशी सादर केल्या. राग हंसध्वनी मधील बंदीश ‘सकल दु:ख हरन ‘, ‘ नित सुमर ना करे ‘, आणि तराना सादर केला. कार्यक्रमाची सांगता संत कबीर यांच्या ‘हिरन समझ बूझ कर बन चरन ‘ या भजनाने झाली.
विदुषी मंजिरी कर्वे – आलेगांवकर यांनी शास्त्रीय संगीताचे सादरीकरण केले. अरविंद परांजपे( तबला ), सौरव दांडेकर ( हार्मोनिअम ) यांनी साथसंगत केली.
हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य होता.